31.5.07

थोडा सा आसमान..

या, या मॅडम.. काय हवंय आपल्याला? म्हणजे कसला चष्मा हवाय? आम्ही बघा सगळ्या प्रकारचे चष्मे विकतो.. ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे!
चष्म्याबाहेरच जग कसं पाहिजे? हसरं, खेळकर की गंभीर? का खुसखुशीत विनोदी?

प्रत्येक क्षण टिपायची धडपड करणारं की प्रत्येकाचे अनुभव इकडून तिकडून सारखेच म्हणून आपलं वेगळेपण सर्वांआधी छापायची धडपड करणारं?
आजकाल ब्लॉग लिहायला लागल्यापासून जो लिहायचा मोड ऑन केलाय, त्यातून बाहेरचं दाखवणारा की त्यातच गुंतवणारा असा चष्मा? काही दिसलं की लिही यावर..
फुगंव शब्दांचे फुगे, आणि कर त्यावर तार्किक विश्लेषण.. शब्दांच्या छटांची भाषांतरे.. आणि त्यामागच्या भावनांच्या गुंत्यांचीही?
प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळं भाषांतर, वेगळे अर्थ.. आणि या कॅलिडोस्कोपमधून पहाताना जे लिहायचं होतं ते कुठतरी हरवूनच जातंय असं काहीसं?
नक्की काय?
त्या त्या क्षणी ते ते लिहावं वाटणं म्हणजे नक्की काय?
त्या क्षणांची उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया की छापखान्याची डेड्लाइन?
स्वसमाधानाची शेखी मिरवायला, सर्जनशीलतेचा डांगोरा पिटायला की प्रतिक्रियांच्या झूली मिरवूनही अलिप्त राहायच्या भासात मश्गूल रहायला?
मॅडम, तुम्हाला त्या वक्त्याची गोष्ट माहितीये का?
अतिशय उत्तम वक्ता, प्रभावी, पण त्याचा एकच प्रॉब्लेम होता.. कुठ्लाही श्रोता नसताना तो खूप छान बोलायचा. ज्याक्षणी कुणीतरी ऍकायला लागायचं त्याक्षणी त्याची बोलती बंद. तो स्वतःच स्वतःचा श्रोता कधी झालाच नाही असं करता करता.. तुम्ही वाचता का हो तुमचं लिहिलेलं एक वाचक म्हणून? का त्यासाठी वेगळा चष्मा देऊ? तटस्थ वाचकाचा?
काय म्हणता, आजकाल तुमच्या पोस्ट्मध्ये प्रश्नांचे गुंते वाढले आहेत?
अहो, असले तर असले..
आता असलेले प्रश्न टाकून जाणार कुठे? कदाचित फक्त लिहून सुटणार नाहीत, पण लिहिल्याचं समाधान तरी..
समाधान!!
आरून फिरून गाडी परत समाधानाच्या शोधात..
का समोरचा समाधानाचा स्टॉप डोळ्याआड करताय? तो दिसावा असा चष्मा देऊ?
दूरवर पाहिलं की शांत करत जाणार्‍या समुद्रासारखं शांतवणारं सुख आणि त्याच्या जोडीला समाधान असं एकदम दिसू शकणारा चष्मा पाहिजे म्हणताय.. हं..
आपले आभाळ मोजावे आपणच
घेऊ नयेत कुणाचीही तटस्थ निरीक्षणे
सांदीफटीतून जर विशिष्ट ओळख नसलेले काही
हाताला लागले तर ते आपले आभाळच असते!

आपले आभाळ जोखावे आपणच
कुण्या दुसर्‍याने त्यात उड्डाणे भरण्याअगोदरच..
हात वर केल्यावर जे हाताला लागत नाही
ते ही असू शकते आपले आभाळच..

आपले आभाळ निरखावे आपणच..
कुण्या दुसर्‍याने त्यात सूर्यास्त चितारण्यापूर्वी
आपल्या आभाळात आपल्या नकळत
खूपदा होत असतात सूर्योदय, उल्कापात.. ग्रहणे

आपले आभाळ कमवावे आपणच
घेऊ नये कुणाचा ढगही उसना
असे उसने उसने ढग, ग्रह, तारे हे सारे मिळूनसुध्दा
दरवेळेला आभाळ बनतेच असे नाही..

आपले आभाळ समजून घ्यावे आपणच
मजेत बघावेत सटासट पडणारे तारे..
त्या आदिम सीनियर आभाळाखाली
आपले ज्युनियर आभाळ तोलत
पटापटा आपले बेसिक क्लियर करून घ्यावे
दोन्ही एकरूप होईपर्यंत!

आपल्या आभाळाच्या शोधात
आपला जन्म..
कुणालाच नकळत विरून गेलेल्या ढगासारखा
निघून जाईल कदाचित..
पण निदान आपल्याच आभाळात जाईल!
संदीपच्या त्या आभाळासाठीचा चष्मा मीही शोधतोय... सापड्ला की नक्की कळवेन!

15 comments:

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
केवळ तुज साठी...! said...

aata paryanta wachlelya blogs madhe this one is THE best..

simply best..

Anonymous said...

वेड्या कवीता करण्याचं एक वय असतं. विचार करायचे दिवस मागाहून येतात. ब्लॉगच्या दिवसात हा प्रवाह जरा शांत/संथ झालेला असतो. कुण्या एकासाठीच्या शोधाची जागा, 'माझीया जातीचे भेटा रे कुणीसे' ची हाक घेते. पण कधी स्वतःशी, कधी इतरांशी कळत-नकळत तुलना आणि वाटणारी वेगळेपणाची ओढ आपल्यावरच एक चष्मा चढवते. this is a trade-off sneha.

everybody wants to be heard, everybody has their stories to tell. and so we listen to others. कधीकधी दुसऱ्याच्या गोष्टीत आपणच असल्याचं आपल्याला जाणवते. more and more you write personal, more and more it becomes universal, cuz basically we all are the same, having earthen feet, ...मृण्मय.

Samved said...

बाप रे...तू मोठ्ठा विषय निवडला आहेस की..ब्लॉग कुणी ही लिहावा.पण पथ्य एकच..अमूक तमूक असा लिहीतो म्हणून मी ही तसंच लिहावं हा हट्ट वाईट. त्याहून ही वाईट म्हणजे जे आपण नाहीत ते portray करणे. या सगळ्यात गंमत काय होते माहीतीये का, की आपण आपल्याला जे व्हावे वाटत असते त्याचे चष्मे स्वःत ला तर चढवतोच पण जे वाचत असतात त्यांच्या डॊळ्यावर ही चढवतो...

Meghana Bhuskute said...

"स्वसमाधानाची शेखी मिरवायला, सर्जनशीलतेचा डांगोरा पिटायला की प्रतिक्रियांच्या झूली मिरवूनही अलिप्त राहायच्या भासात मश्गूल रहायला?"
इतकं खरं बोलून प्रॉब्लेम होतो ना!
Anyway - मजा येतेय! :)

कोहम said...

masta post aahe....avadala....btw....me US madhe nahiye me AUS madhe aahe....but if I can do some work from here....I shall be more than glad.....do mail me some information on gadren@rediffmail.com

Anonymous said...

फारच सुंदर!

mad-z said...

मी एक पाहिलंय. बहूधा सर्वच ब्लॉगर मनात जे आहे ते लिहीतात .. म्हणजे कल्पनाविलास हा ब्लॉगर्सचा धर्म नाहीये. जे मनात आलं ते अगदी स्वच्छपणे लिहून मोकळे ... आणि तसं नसेल तर मग माझं नशीब चांगलं की मी सगळ्या बिनचश्म्याच्या ब्लॉगरशीच भेटलो.

संवेद म्हणतो ते अगदी १००% खरं. तसा हट्ट करणं म्हणजे शुद्ध वेडेपणा. शेवटी ब्लॉग म्हणजे मत माडण्याचं स्टेज ... इथं येवून खोटं बोलायचं तर मग पोलिटिक्स मधे जा ना. तिथं पुष्कळ भेटतील जातीचे. इथं याल तर अगदी मोकळ्या मनानं प्रामाणीकपणे बोला, भेटा .. एकूण काय तर माणूस म्हणून जगा. चश्मे शोधायचे तर बाकी बर्याच जागा आहेत.

ओहित म्हणे said...

that was good Sneha. You are back with a bang. right on the target. This is actually the interesting part of human being. We always manage to see what we want to see instead of what is to be seen. i wont compare the two. after all, being happy is the human tendency - so by hook or by crook.

i would say the one with max spectacles ... lived the life to the fullest. :)

सहज said...

ekdum patya apneko !!

pan lihinaryane je lihile te ka lihilie ? hya pekha te mala vachnya sarkhe vatale ka ? aavadale ka ? patale ka ? ..he prashan purese aahet.

mazya mate, ek vachak mhanun ha khel sopa aahe, nahi ka ?

Sneha Kulkarni said...

साबाजी, अनामिक, संवेद, मेघना, कोहम,शैलेश, mad-z, रोहित आणि सहज, तुम्हा सर्वांच्या अभिप्रायाबद्द्ल आभारी आहे.

अनामिकः आपण कितीही म्हटलं तरी प्रत्येकाला आपले अनुभव unique वाटत असतातच. मग तू म्हटल्याप्रमाणे चष्मा चढवला जातो काहीतरी वेगळं असं दाखवायला.

संवेद : रोहितने म्हटल्यासारखे आपल्याला जसे हवेय, तसेच पहायचा अट्टाहास असतो ना कधीकधी. मग त्यात चष्मे चढवले जातात, कधी नकळत कधी जाणून बुजून.

मेघना: खरं आहे गं! :)

mad-z : कधीकधी चष्म्यातून पाहायची इतकी सवय होते की आपल्याला समोरच्या व्यक्ती चष्म्याशिवाय ओळखू नाही येत. आणि सारेच चष्मे वाईट नसतात. जसा तटस्थ वाचकाचा चष्मा. म्हणून तर तो चष्मा आहे, गॉगल नाही. Anyways take it easy!!

सहजः वाचणार्‍यांचे चष्मे वेगळे, कधीकधी आधीच्या पोस्ट्चा चष्मा पुढच्या पोस्ट्ला लागतोच की. अर्थात 'मला आवडले का' या निष्कर्षामुळे गोष्टी थोड्या सोप्या होतात हे खरेय!

Vidya Bhutkar said...

Hi Sneha, this is the first time I visited your blog.Read most of the posts. and I liked it very much. Keep writing.
-Vidya.

सर्किट said...

hi sneha, vidya pramanech mi hi tuzya blog la pahilyandach bhet dili. chhaan lihites tu. ani agadi gayatri, ani tyulip chya sarakhya takadichya likhikansarakha tuzahi likhan ahe. :-)

will keep visiting your blog more often now.

good luck!

प्रशांत said...

तुम्ही सुरेख लिहिता. कविताही छान आहे.
-प्रशांत

Sneha Kulkarni said...

विद्या, अभिजीत आणि प्रशांत तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार!! :)

प्रशांत : ती कविता संदीप खरेची आहे, आपला गैरसमज झाला असेल तर त्याबद्द्ल क्षमस्व.

अभिजीतः अरे तू माझं तट्टू अगदी रथी- महारथींशेजारी नेलंस की! :-)