30.6.07

बोलाचा भात!

"ताल्पिट.. क्या होता है ये?" माझ्या अमराठी रूममेट्ने शक्य तितका बरोबर उच्चार करत विचारलं.
" ओह, थालीपीठ ( ठ चा अगदी ठसठशीत उच्चार करत) अरे बहोत सही होता है.. मेरी मॉम बनाती है ना ( माझ्या जवळपास सगळ्या पदार्थांची सांगायची सुरवात माझी आई/मावशी/ काकू/ आत्या/ आज्जी यानी बनवलेल्या त्या पदार्थांच्या आठवणीत रमलेल्या मनाला जागं करून होते. ) तो पहले हम सारे आटे (??) आय मीन सारे फ्लोअर लेके उसमे ओनियन ( प्याज गं ,माझी बयो) डालते है और उसका गोला बनाके तवे पे थापते मतलब लगाते है.. ( हिंदीचा आणि पर्यायाने थालीपीठाच्या रेसिपीचा यथास्थित चुराडा करूनही माझ्या रूममेटच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह काय संपलं नाही.)

आता एखादीनं काय केलं असतं की एकतर गेला बाजार आपली हिंदी सुधारून चांगली रेसिपी दिली असती नाहीतर कमीतकमी थालीपीठ करून खायला घातलं असतं. पण नाही, आम्ही समस्या दिसली किंवा नसली तरी शोधून काढून त्याचे विश्लेषण करणार. तिच्या (समस्येच्या हो) मूळावर घाव घालायच्या प्रयत्नात आम्ही. तर आमचे असं का होतं? दाक्षिणात्यांची इडली-डोसा-सांबार , पंजाब्यांचे सरसों का साग आणि मक्के की रोटी इतकं जगप्रसिध्द आणि जगभर मिळत असताना आमच्या मराठी पदार्थांना काहीच 'ब्रँड व्हॅल्यू' असू नये म्हणजे काय ते! प्रश्न अगदी मराठी अस्मिता- आम्ही मराठी सदैव मागंमागंच का, अशा धोकादायक वळणांवर जाताना पाहून मी विचारांचे उधळलेले घोडे आवरले आणि पाककृतीचा शोध सुरू केला.
अस्सल मराठीतून गुगलून झाल्यावरही हव्या तशा पाककृती सापडेनात ( थालीपीठ हा एक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे यावर विकी ने थालीपीठाला खाऊन टाकलं होतं!) मराठीतून फूड ब्लॉग (अर्थात अन्न्-जालनिशी??) खूपच कमी आहेत असंही दिसलं. इंग्लिश्मधले सुरेख छायाचित्रांनी नटलेले ब्लॉग्ज पाहून खर्‍या अर्थानं रसना रसरसली. पण असे सुरेख पदार्थ माझ्या हाती आपलं सारं अस्तित्व विसरून तिसर्‍याच कशाच्या रूपात अवतीर्ण होतात हे काही नवीन नाहिये! आताही थालीपीठांनी तवा सोडायचं नाकारलं, आपलं तोंड काळं करत तव्याचा बट्ट्याबोळ करवला जेणेकरून माझ्या रूममेट्ला कुठुन ही अवदसा आठवली याचा पुनःप्रत्यय दिला.(काम आणि कंटाळा याच्या अभूतपूर्व संगमामुळे मी मागच्या पोस्टवरती अजून प्रतिक्रिया टाकतेच आहे, अशा भयानक उत्साही मला असलं काही सुचलं याचं समाधान वाटावं की केलेल्या पराक्रमामुळे थक्क व्हावं असा पेच पडला असणार तिला!! :D ) आणि वरती माझी प्रतिक्रिया होतीच, अरे मेरी मॉम ये बहोत अच्छा बनाती है.. ( खरंतर 'मी बनवलेला हा पदार्थ आतापर्यंत मी खाल्लेला सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे' आणि 'माझे केस हे सगळ्यात सुंदर केस आहेत' असं म्हणणारी मुलगी/तरूणी/स्त्री/ वृद्धा मलातरी आढळलेली नाहीये, त्यामुळे मी ही काहीही केलं आणि कसंही झालं तरी पहिलं वक्तव्य करायचं सोडत नाही!!)
माझे प्रयोग मी संपवल्यानंतर माझ्या रूमीने शहाणपणाने भात रांधायला घेतला आणि डाळ शिजायला ठेवली. तस्मात काय, कधीतरी स्वयपाकघरात जाऊन प्रयोग करण्यापेक्षा मराठी अस्मिता जपायचे अजून मार्ग आहेत ( आणि ते तोंडातून जात असले तरी पोटात जात नाहीत!) त्यामुळे बोलांच्या कढीभाताचे प्रयोग सुरू ठेवणे श्रेयस्कर!

17 comments:

Meghana Bhuskute said...

he he he! bhajanich kartat, ewadh thauk ahe mala. pan bhajani kashi kartat kay thauk!!

Parag said...

good one.. :)

Samved said...

बरोब्बर मेघना..थालिपीठ भाजणीचं करतात..तेच ते ज्याची चकली करतात. स्नेहा..तू please सुभाष अवचटच स्टुडिओ वाचच..काय अप्रतिम वर्णन केलय थालपिठ आणि इतर मराठी पदार्थांच...
तुला तुझ्या रुपा (room partner)ला खाऊ घालायला काही सोपे आणि चविष्ट पदार्थ आहेतच की..फोडणीचा भात, पोळीचा कुस्करा:)....मराठीत आपल्याला भरपूर स्कोप आहे वाट्टेल ते करायला...सोडु नकोस..मराठी अस्मिता तुझ्या हातात आहे....

अनु said...

Hmm.
Though there are no much marathi blogs on recepies, there are many recipies on www.manogat.com 'pakkruti' vibhag.
I have sanjeeva kapoor's e-book,and many marathi recipies are there with proper original name and original recipie with no non marathi modifications in it.

Anand Sarolkar said...

Me Punyat astana ekda pruyatna kela hota Thalipith (Spelling barobar ahe na? ;D) karnyacha majha roomie jhopunhi gela hota te tayar hoi paryant! Ani thalipith ekdum kadak jhale hote. tya nantar kadhi prayog nahi kela...pan policha kuskara matra mast karta yeto mala!

madhura said...

samved thalipith chi bhajani vegali aani chakalichi vegali.
kadabolchi bhajani aani thalipithachi bhajani same asate,chakalichi navhe.

Monsieur K said...

ghari rahaat astaanaa, mala kadhi hee thaalipeeth aavaDaayachaa naahi. pan gharaa baaher raahilyaavar, aata jevha aai thaalipeeth karte, tevhaa without any complaints khaato :D
in comparison to north indian or south indian cuisine, aapla roj-cha jevan tasa relatively saadha asta - aani marathi maanus tasaa hee generally tends to keep a low profile. maybe that is why we dont have those many foodie blogs specific to maharashtrian cuisine.

anyways, nehmi saarkhach, this post is also well written :)

Samved said...

Oops....my mistake...thanks Madhura for correcting me...My wife was laughing when I told her about bhajani...and questionned in the first place about my OC to write a comment on cooking:)

HAREKRISHNAJI said...

Thalipit and Lonyacha gola, ahahaa what else is required

Anonymous said...

Class !!!!!
Ata apan milun Thalipithache prayog karu.... kay?????
Tuzya blog var aaj pahilynada comment takatiye. By the way, lekh mast aahe..(????) Sorry... Sorry... sagalech lekh mast aahet...
Tuza ha blog lekhanacha prayog barach successfully chalu aahe...Good...Keep it up !!!!

-Arati

Sneha Kulkarni said...

एकदम पोटभरून आभार!!

जरा बस्तान बसवण्यात वेळ लागला आणि इथे बघायलाच झालं नाही.. :)

मेघना: अगं हे थालीपीठ भाजणीचं नाही गं. माझी आई इन्स्टंट पीठं मिसळून करते. एकदम सही लागतं खरं.. घरी गेल्यावर आधी थालीपीठाची फर्माईश झाली मग!

परागः धन्यवाद!!

संवेदः अरे तो 'स्टुडिओ' चा रेफरन्स सही!! लगेच वाचून काढलं, अर्थातच सगळं नाही. पण थालीपीठाचा उल्लेख वाचला. आणि ते कुमारांबद्द्ल पण काय छान लिहिलेय! सांगितल्याबद्द्ल अनेकानेक धन्यवाद! आणि कल्याणी डॉन आहे या सगळ्यात असं तुझ्याच कोलाजवाल्या पोस्ट्वरून वाटतंय. तिला हे वाचल्यावर माझी कीव वगैरे येइल आता .. :)

अनु: अगं, तशा मायबोलीवर पण आहेत गं आणि काही इंग्लिश ब्लॉगवरपण आहेत. पण मराठीत तितक्या कलात्मकतेने नटलेले फारसे ब्लॉग्ज सापडले नाहीत मला! :(

आनंदः पोळीचा कुस्करा.. काय रेसिपी दे की ;)

मधुरा: हे माझ्यासाठीपण अपडेट होतं..

केतनः अगदी माझ्यासारखंच.. अर्थात जे तुझं थालीपीठाबद्द्ल झालं तसं माझं बाकिच्या काही पदार्थांबद्द्ल झालेलं. बाकी भारतात परतलास काय? लिही कि काहीतरी आता.

हरेकृष्णजी: अगदी! लोण्याचा उल्लेख राहिलाच माझा.

आरती: ये गं तू. सगळे प्रयोग करूयात.

Vidya Bhutkar said...

हीहीही... :-ड
आता तू म्हणालीस तसं मी पण माझं द्न्यान पाजळतेच. :-) आतापर्यंत मी ८-१० वेळा तरी थालीपीठ बनवले आहे. और मेरी सफलता का राज है,'चितळेंची थालीपीठ भाजणी'. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून पीठ बऱ्यापैकी सैल मळून घ्यायचं आणि पातळ फडक्यावर किंवा रुमालावर थापायचं. :-) बाकी तव्यावर काय होतं ते ज्याच्या-त्याच्या करण्यावर....त्यावर माझा डिस्क्लेमर. :-) तूप किंवा लोण्याबरोबस खायचं.....अहाहाहा...आता मला भाजणी आणलीच पाहिजे. :-P
मराठी पाककृतिंचे ब्लॉग खूपच कमी आहेत हे मात्र खरं.

Samved said...

स्नेहा, तुझं थालपिठ करुन झालं असेल तर आता पुढचं लिही नां...
:)

Rohit said...

बापरे ... स्नेहा!! थालीपीठासाठी ईतकी मारामार!! कसे व्हायचे ग तुझे!! संपदा ला विचार ... औंधात असताना तिला करून घातलेले मी आणि विशूने! [:)]आणि चांगले पण झालेले!

sampada said...

Rohit mhanala te matra khara ahe.amhi lai bhari thalipith kela hota.. 5 lokani milun try kela hota.. chan ahe blog :)

Anonymous said...

awesome blog sneha..I thought only pula deshpande can write such interesting marathi..keep up the good work! -Yogesh

shinu said...

अरे व्वा! काय मस्त जमलंय. ब्लॊगना भेट देता देता मला इतकं नक्की समजलंय की मराठीत रेसेपीवर जितक्या पोस्ट नसतील तेव्हढ्या पोस्ट बिघडलेल्या रेसेपीवर आहेत. तुझं थालीपीठ तव्यावर कसंही झालेलं असु दे इथे मात्र झकास, कुरकुरीत झालंय.