26.4.07

James, did you earn that?

रियान, शेवटी तुलापण स्वतःचं आयुष्य सार्थकी लागल्याचं सर्टिफिकेट कुणा दुसर्‍याकडून घ्यावं लागावं? युद्धातल्या त्या रणधुमाळीनंतर सगळं कळून- उमजून चुकलं तुला असं वाटलं रे!
ते धडाधडा आदळणारे बाँबगोळे,
रक्तामांसाचा सडा,
समुद्रकिनार्‍‍यावर प्रेतांचा खच
आजवर समुद्र म्हटलं की फक्त रोमँटिक भावना जुळलेल्या
रक्त - पाणी - रक्त
सगळं रोमँटिसिझम खरडून काढलंस तू..
गुळगुळीत कागदावरच्या रंगीबेरंगी बातम्या वाचायची सवय आम्हाला रे!
युद्ध कसं आकड्यांच्या भाषेत ऐकून सोडून देतो रे आम्ही..
'आजच्या गोळीबारात २ ठार १० जखमी'
एखादा सुस्कारा आणि चहाच्या घोटाबरोबर पुढली बातमी..
असं युध्द अंगावर येत रहात.. सगळं मन सुन्न करत..
तो सैनिक आईच्या आठवणीनं व्याकूळ झालेला?
आणि इमर्सन शिकवणारा तो मिलर.. युद्ध त्यालासुध्दा चकवा देऊन गेलं?
जखमींनी मरण परवडलं म्हणत कण्हायचं की 'जगलो वाचलो' म्हणून आनंदाचे उसासे टाकत रहायचं?
दोन वर्षं घरापासून दूर राहिलेला तू.. आपल्या भावांचे चेहरे आठवायच्या प्रयत्नात, पाटी परत परत कोरीच होत चाललिये का?
तत्वासाठीचं युद्ध की एकासाठी एक असं सूड घेत रहाणं?

शांतीच्या मृगजळापाठी धावत रहाणं..
का कुठ्ल्यातरी कर्तव्यापोटी करत जाणं?
प्रश्नांची उत्तरं सापडली का कधी नंतरच्या प्रवासात..
तथाकथित सुखी आयुष्य का त्यावर युद्धाची छाया येत रहाते अधुनमधुन?
आणि तुझी आई.. अशीच कासावीस होत राहिली का रे, तुम्हा चौघांच्या आठवणीनं?
'तेरी राह तके अखियां, जाने कैसा कैसा होवे जिया' ...
का एका पोराला पाहुन डोळे निवले तिचे?
Saving Private Ryan पाहताना पडलेले असंख्य प्रश्न ..कधीही न पूर्ण होणारं कोलाज..

'Earn this..' म्हणणारा मिलर आणि सभोवताली उध्वस्त इमारती..

कित्येक स्वप्नं.. आशा.. सगळ्यांना ढिगार्‍यात सामावून घेत.

आपल्या प्रश्नांचा चक्रव्यूह आणि आपणच अभिमन्यू..
.काही काही प्रश्न कधीच सुटत नाहीत, बगल देत जात रहायच?

4 comments:

Rohit said...

You missed one line at the Top

Rating: Adult

किती ते रक्त!! पण अक्षरांमधे खेळणाऱ्या लेखिकेला अचानक रक्त वगैरेवर का लिहावे वाटले हे बाकी खास आहे!

it makes you think though ... no doubts

Samved said...

saving private..बघीतला तेंव्हा झेपलाच नाही. युध्द कोणाला हवं असतं? तुझ्या माझ्यासारख्या सामान्य जनतेला नक्कीच नाही पण परिणाम भोगायला सर्वात पुढे आपण असतो. भारत खरया अर्थाने कधीच महायुध्दात उतरला नाही आणि म्हणून आपण त्याची दाहकताही पाहीली नाही. नाही म्हणायला युरोपचे art form युध्दामुळे प्रचंड mature झाले आणि आपण आहे तिथेच राहीलो.

on a lighter note, have you noted your frequency of publishing blog? you need to do something about it...we are waiting for more from you

All Blog Spots said...

your blog is really nice , it simply tells how beautiful your thoughts are ! Great wrok

Burdette said...

Good words.