9.4.07

प्रोग्रॅमर उवाच्!

" फक्त आत्मिक समाधान महत्वाचं! "
" हं.. आता संसार असार आहे असं म्हण आता.."
" ग्रेटच आहेस तू, तुला काय माहित मी काय म्हणणार आहे ते पुढं.. बघ म्हणुन आपली वेव्हलेंग्थ जुळते!"
"बरं, हे संसार असार कुठुन आलं? कारण ३ आठवड्यापूर्वी तू QLC वर संशोधन करत होतास आणि त्यानंतर त्या इशिता शर्माच्या प्रोजेक्टमध्ये लागल्यावर तुला 'हे जीवन सुंदर आहे' असा साक्षात्कार झालेला. आता ती एंगेज्ड आहे हे तर कळुनपण एक आठवडा झाला, मग आज हा मूड का? सकाळी आजतक ऍवजी दुसरं कुठलं चॅनेल लावलंस काय्?"
"नाही, पण हे जीवन, संसार, प्रोगॅमिंग सगळी माया आहे!"
"हा, आता IT वर माया असेल नसेल तरी यामुळे उदंड माया मिळते एवढे ठाऊक आहे बाबा. आता ही तिसरी माया मेमसाब कोण? इस दिल मे बस के देखोवाली कुणी मिळाली काय्?"
"माया मेमसाब कुठुन आली इथे? ही मायाजालातली माया आहे!"
" अरे, हळू बोल. उगाच मोठ्याने 'माया' 'माया' करू नकोस.. साहेबाला विनाकारण संशय. आधीच माझ्यावर खार खाऊन आहे तो. ए, पण तुझी कसलीतरी मीटिंग होती ना? काय झालं?"
" अरे तेच अप्रेझल मीटिंग होती.."
"सहीच.. तुझं रेटिंग चांगलं होतं ना, मग धनलाभ काही?"
"तेच तर ना, शेवटी पैसा सर्वस्व नाही रे! आत्मिक समाधानालासुध्दा काही किंमत आहेच की.."
" हो ना.. आणि पुढे?"
" अरे, आपलं काम महत्वाचं, त्यामागची आपली तळमळ महत्वाची.. पैसा काय मिळत रहातो.."
" हा उपदेश हे अप्रेझल मीटिंगच फलित वाटतं!!"
"अर्थातच्!"
" हो ना, म्हणुन साहेबाने सात कंपन्या सोडुन इथे निगोशिएट केलं वाटतं.. "
" सात?"
" हो, आणि राहिलं तुझ्या आत्मिक समाधानाचं, तर उद्यापासून त्या खडुस घरमालकाला थोडं समाधान दरमहा पोचवत जा. आणि इस्क्वेअरच्या डोअरकीपरला पण थोडं देउयात.. कसं?"
"अरे पण्,..."
" हे बघ, प्रोजेक्ट डिलीवर केल्यानंतर येणारे सगळे 'बग्ज्' प्रोग्रॅमिंग ही माया आहे अशा दृष्टिने पहा आणि अप्रेझलला मायालाभाचा दृष्टीकोन ठेव. मग बघ, ती इशितापण कसा भाव देते ते. आत्मिक समाधान याहून वेगळं असं ते काय्?"
" इति अप्रेझल-अध्यायो समाप्तः!"

13 comments:

Rohit said...

layee bharee!!! tujhe appraisal kadhi jhale BTW?

अनु said...

Hahaha
Sahamat. Mazehi anubhav kahise asech.
http://anukulkarni.blogspot.com/2007/03/blog-post_7031.html

केवळ तुज साठी...! said...

apratim..!

IT madhlya pratyek programmer chi khanta tu sangitli aahes...

By the way, tujha Mgr kon aahe?

Parag said...

he he he;) hey this is good!!

Monsieur K said...

hehehehe :)))
i keep saying every now n then "sab maaya hai", especially helps in the rationalization process in the post-appraisal period.
the only problem is that the mind being a firm believer in 'low aim is a crime', or lofty ideals like 'fairness/equality exists' - its difficult to accept reality. :)

~ketan

Mahesh said...

hmm.. sundar aahet ha articles..

HAREKRISHNAJI said...

you are rubbing salt on my wounds too

Samved said...

Thanks a lot for your comment on my blog!
One of my friend told me that in a DVD released by FTII, there is Smita's first movie called "Teevra Madhyam".
By the way, this DVD consists of many "first-of" like Jaya Bhaduri!! Crossword has it.

स्नेहल said...

mastch ga!!! cricket cricket paN sahee jamalaay :)
"out" best aahe....

स्नेहा कुलकर्णी said...

रोहित, अनु, पराग, महेश, स्नेहल, साबाजी: धन्यवाद! तुमच्या प्रतिक्रिया हेच माझं 'अप्रेझल'!!

केतन : अगदी सहमत.

हरेकृष्णजी आणि संवेद : तुमच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देत आहे.

Anonymous said...

kaa ga/ kharaab rating aale ki kaay/
aso...pan asa bagh ki s/w madhun milanari "arth"purn maaya hi pan shewati miththyaa aahe...tasmaat: "bembatya, kumbhar ho, jagaat gadhavanchi kami nahi :)"

HAREKRISHNAJI said...

आपण ब्लॉगवर प्रतिक्रिया देणार आहात ह्याची आठ्वण असावी

HAREKRISHNAJI said...

स्नेहाजी,

मला असे म्हणायचे होते की आपण जणु काय माझाच भावना या लेखात व्यक्त केल्या आहेत. खर म्हणजे संदिर्ग comments लिहील्याबद्द्ल मीच दिलगीरी व्यक्त करायली हवी.