19.8.07

कभी ना बीते चमकीले दिन..

The Happiest Man मध्ये डॅनी के आपल्या आईला विचारतो, 'हे इतके श्रीमंत लोक आपल्या घरी पुन्हा पुन्हा का येतात गं? ' त्यावर त्याची आई म्हणते, 'त्यांच्या आयुष्यातला खूप चांगला भाग ते इथेच ठेवून गेले आहेत ना, तो परत जगायला!'
पहिल्यांदा जेव्हा वाचलं तेव्हा हे कळंलं असं वाटलेलं उगीच. खरंतर असं असेल अशी किंचितही जाणीव नसलेले ते दिवस. एकाच छापाचे दिवस असू शकतात हेच मुळी कळायचं होतं तेव्हा. किंबहुना 'लख्ख उजळलेले दिवस' ही संकल्पना जन्मायची होती माझ्यापुरती.
एखादा मठ्ठ रटाळ दिवस उगवावा, कुठल्यातरी जुन्या वाईट आठवणींच सावट घेऊन आल्यासारखा. त्यात धबधबा पाऊस कोसळतोय म्हणजे डिप्रेसिंग मूड्ला अगदी निमंत्रणंच. हुरहुरणारी कातरवेळ अजूनच गडद होत जाणारी. अशात एकदम कुठलीतरी मैत्रिण खळाळणार्‍या उत्साहात घरी येते किंवा अचानक एखादा मित्र भेट्तो रस्त्यावर.
जादूची कांडी फिरवावी तशी आनंदाची वलयं ओसंडून जातात.
तेव्हा त्या वलयात आजूबाजूची माणसं, पाऊस असल्या सगळ्या गोष्टी हरवतात. कुठल्याकुठल्या आपल्या आपल्या वाटणार्‍या गूळपीठीय गोष्टींना वाचा फुटते आणि इतके दिवस हे कुठं लपून राहिलेलं असं वाटायला लागतं. मगाचच्या त्या 'मूड' ची पुरती दाणादाण उड्ते. काहीही ग्रेट न करताही उगाचच काहीतरी अचिव्ह केल्याची जाणीव होते आणि फक्त संध्याकाळच नाही तर अख्खा दिवस लख्ख उजळून जातो मग.( आता यासाठी थँक्स म्हणण्याइतका कोरडेपणा नाही करता येत मला, आणि सुदैवानं माझं बरंचसं मित्रमंडळ हे वाचतही नाही त्यामुळं त्याची फारशी गरजही नाहीये! :P )
कधीकधी जो आयुष्यातला चांगला भाग ज्यांच्या हाती सोपवून मी विसरले आहे, ते असे अधूनमधून त्याची जाणीव करून देतात. त्याला नॉस्टॅल्जिया म्हणा किंवा काहीही. पण 'आपण भारीच आहे रे!' या ब्रीदवाक्याची परत गर्जना करत पुढच्या कित्येक एकसुरी दिवसांची धार कमी होते हे निश्चित!

8 comments:

tanu said...

ekdum sahi

ओहित म्हणे said...

ओ बाई ... आपण खरच भारी आहोत!! काय शंका आहे काय?

तझे खरे आहे पण ... हे म्हणजे कोणी कंपनी सोडायला लागला की HR ला आठवते की हा किती महत्वाचा resource आहे आणि मग शंभर प्रकार त्याला ठेवायसाठी! आपले असेच असते की! जोपर्यंत काही गमावत नाही तोवर कळतच नाही की आपल्याकडे होते हे सगळे!

दिवस अल्हाददायक "होते" ही आठवते जेव्हा ते एका छापासारखे होतात! पण एक बघ न ... याचा अर्थ आत्ताही काहीतरी असलेच पाहिजे आपल्यात की जे कदाचीत नंतर जानवेल! ढुंडो! नहीतो ढुंडते रेह जाओगे!

बाकी असते मात्र कला बऱ्याच लोकांच्यात एका भेटीत समोरच्याचा मूड बदलायची! तुच बदलायचीस की माझा मूड ...त्या कथेच्या वेळी! ;-)

Meghana Bhuskute said...

agadi khara!

HAREKRISHNAJI said...

खरय. बऱ्याच दिवसानी आपल्या बॉग वर वाचायाला मिळाले.

Samved said...

true...golden days..

deepanjali said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)

ओहित म्हणे said...

लिहायचे विसरलीस काय?

Monsieur K said...

well said Sneha!
yup, childhood days are indeed golden days of life. kaslich chinta naste, kuthlihee kaalji naste. fakt abhyaas karaaycha, mast khaaycha-pyaaycha, bharpur khelaaycha :)
asach chhaan lihit rahaa - tyaatlaa aanand hee veglaach, naahi kaa?