अस्मादिकांच्या 'ब्लॉग लिहिण्याचा' प्रस्ताव अखिल मित्रसंप्रदायात इतकी खळबळ माजवेल याची यत्किंचीतही कल्पना नव्हती मला! मी ब्लॉग लिहिणार हे कळताच प्रतिकियांचा पाऊस सुरु झाला.
१. "ब्लॉग.. हम्म्.. कशाशी खातात हे तरी माहित आहे का तुला?"
२. "वेळ घालवायला काहीतरी हवं की तुला.. पण नुसतेच कळफलकावर आपटाआपटी करू नकोस.."
३. "आणखिन एक ब्लॉग झेलायला तयार रहा रे!!.."
४. "फक्त आम्हालाच का तुला सहन करावं लागावं, कर सुरुवात.."
५. " तू लिहित रहा, फळाची म्हणजे कुणी वाचेल अशी अपेक्षा नको करू. 'लेखकु उदंड जाहला' अशा युगात 'वाचकु' लाभेल न लाभेल तरी आपण लेखनप्रपंच सुरु ठेवावा हेच बरं, नाही का?"
छिद्रान्वेषीनी माझ्या लेखनप्रतिभेला अडसर घातला तरी थांबून रहाणारी मी थोडीच आहे!! :-) आपल्या इतक्या अनुभवांचा साठा जगापुढे मांडला नाही तर जग एका मोठया प्रतिभावंताला मुकेल का काय, असे वाटून मी लगेच लेखणी हाती धरली. 'येथे पाहिजे जातीचे' हे त्या वंशाला गेल्याशिवाय कळणार कसे म्हणा!!
त्यामुळे 'एकला चलो रे' च्या धर्तीवर मनाच्या गुंत्यात गुंफलेला हा शेला विणायला तरी घेतला आहे. शेवटी केल्विनच्या शब्दात सांगायच तर, 'It's magical world, Hobbes, ol' buddy.. let's go exploring!'
18.3.07
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
आधी पहिले तर शैला असे कहितरी लिहिलेयस असे वाटले! पण पूर्ण वाचल्यावर मग प्रकाश पडला की नाव काहितरी वेगळे आहे! Whatever ... good to see you on blogs finally! BTW तू काढलेली चित्रे कधी post करणार तेही सांग की! :)
खंरच! तुझ्य लेखनप्रतिभेला चांगली दाद नक्की मिळेल. काही तरी वेगळं आणि प्रगल्भ साहित्य निर्माण करण्याची ताकद मराठी भाषेत आहे, "माझिया मराठीचा बोलु, अमृता पैजा जिंकेल" हे वाक्य सार्थ कर...
नशिबाने आपल्याला ब्लॉग लिहिण्याची हुक्की आली नाहीतर
जग एका मोठया प्रतिभावंताला नक्कीच मुकेल असते, असे आमचे ठाम मत आहे.
आपल्या तथाकथित हितचिंतकांची द्खल घेणे गरजेचे नाहि,
आम्ही आहोत ना सहन करायला. तरी आपण लेखनप्रपंच सुरु ठेवावा
To be frank
रोहित बरोबर म्हणतो It's something different.
Keep it up.
chan aahe tujhe likhan.
asach nav-navin vachayala det ja
karan asa kahi lihayala aamhala baap-janmat suchanar nahi.Tu mhanates tase
'येथे पाहिजे जातीचे'
Keep it up.
रोहित : चित्रे टाकते लवकरच!
केवळ तुजसाठी: तुला 'माझिया मऱ्हाठीचे बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके' असं म्हणायचं आहे का? धन्यवाद!
हरेकृष्णजी: प्रोत्साहनासाठी अत्यंत आभारी आहे!
दीपा : आता पोस्ट्ला एक वाचक नक्की का?
Mazi pratikriya ekach-
Khumasdar ani khuskhushit
Tuzya sahitya pratibhebaddal kahi shanka nhavati karan ti parampara tar Kulkarnyanchayt D.V. Kulkarnyanpasun chalat aliy.
Mala sarwat jast ascharya watle te-
tu evdha sagala marathi type kasa karu shakalis yachach.
So Keep it up....!
Post a Comment